
काहीवेळेला काहीलोकं अशी काही कृती करतात जी त्यांच्या जीवावर बेतू शकते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये एका तरुणाने लायटर मिळाले नाही म्हणून चक्क स्कूटरला आग लावून सिगारेट पेटवली. पण त्याची ही कृती जीवघेणी ठरु शकते.
सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा तरुण त्याच्या स्कूटरच्या इंधन टाकीचे झाकण उघडत आहे. यानंतर तो आग लावतो आणि नंतर या आगीत सिगारेट पेटवतो. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 68 लाख लोकांनी पाहिला आहे. याशिवाय 2.95 लाख लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. पण चुकूनही हे करण्याचा प्रयत्न करू नका. स्कूटर असो किंवा इतर कोणतेही वाहन, इंधन टाकी हा अतिशय संवेदनशील भाग आहे. त्याच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. काही चूक झाली तर आग लागू शकते.
या व्हायरल व्हिडिओबाबत तज्ज्ञ सांगतात, व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे ते करणे खूप धोकादायक असू शकते. जर तुम्ही झाकण बंद करून इंधन टाकीला आग लावली आणि नंतर आग विझवली, तर स्कूटरच्या टाकीत गॅस तयार होऊन स्फोट होऊ शकतो. यामुळे जीवही जाऊ शकतो. याशिवाय आसपासच्या इतर लोकांचेही नुकसान होऊ शकते.
इंधन टाकीची काळजी घ्या
इंधन टाकीभोवती धुम्रपान करू नका. पेट्रोल आणि डिझेल हे अत्यंत ज्वलनशील असून, बिडी आणि सिगारेटच्या ठिणग्यांमुळे आग लागू शकते. इंधन टाकीजवळ मोबाईल फोन वापरू नका. मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिओ लहरीही आगीचे कारण बनू शकतात. गाडी चालवताना इंधन टाकीचे झाकण नेहमी बंद ठेवा. इंधन टाकीजवळ आग लावू नका. जर तुम्हाला इंधन टाकीमधून गळती होत असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब वाहन चालवणे थांबवा आणि त्याची दुरुस्ती करा. इंधन टाकीसह वाहनाच्या संवेदनशील भागांबद्दल तज्ञांकडून माहिती मिळवा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना त्याबद्दल जागरूक करा. गाडीची टाकी कधीही भरून घेऊ नका. ओव्हरफिलिंग टाळावे, कारण इंधन टाकीमध्ये काही जागा रिकामी ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. इंधन टाकीभोवती नेहमी सावधगिरी बाळगा आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास वेळीच मेकॅनिककडे जा.






























































