केरळमध्ये सापडला मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 31 वर्षांचा हा तरुण 13 जुलैला दुबईवरून परतला होता. त्यांच्या संपर्कातील सर्वांनाही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

केरळमध्येच काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातमधून आलेल्या एका 35 वर्षांच्या पुरुषाला 14 जुलैला मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, केरळमधील 14 जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला असून चार विमानतळांवर हेल्पडेस्क सुरू करण्यात आला आहे.