हिंदुस्थान–विंडीज दुसरी वन डे आज, लढतीवर पावसाचे सावट नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पोर्ट ऑफ स्पेन

टी-20 क्रिकेट मालिकेत यजमान वेस्ट इंडीजवर 3-0 असे निर्भेळ यश मिळविल्यानंतर ‘टीम इंडिया’ वन डे मालिकेतही विजयी प्रारंभासाठी उत्सुक होती. मात्र पावसामुळे हा सामना 13 षटकांच्या खेळानंतर रद्द झाला, मात्र उद्या होणाऱया दुसऱया लढतीवर पावसाचे सावट नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

उभय संघांत बदलाची शक्यता नाही

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’मध्ये दुसऱया लढतीत बदल होण्याची शक्यता नाही. विश्वचषक स्पर्धेत जायबंदी झालेल्या शिखर धवनचे पुनरागमन झाले असून श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कुलदीप यादक आणि खलील अहमद या नव्या दमाच्या खेळाडूंना विंडीज दौऱयावर संधी मिळाली आहे, मात्र धवन संघात परतल्याने लोकेश राहुलची अंतिम 11 खेळाडूंमध्ये वर्णी लागली नाही. पावसामुळे सलामीचा सामना रद्द झाल्याने खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळाली नाही. पावसापूर्वी विंडीजने 13 षटकांत 1 बाद 54 धावा केल्या होत्या. कुलदीपने ख्रिस गेलचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला होता, मात्र 3 षटकांत 27 धावा देऊन खलील अहमद महागडा गोलंदाज ठरला होता. विंडीजच्या संघातही बदलाची शक्यता वाटत नाही. ख्रिस गेलने 31 चेंडूंत केवळ 4 धावा केल्या होत्या, मात्र त्याचा अनुभव बघता त्याला वगळण्याची शक्यता धूसर आहे.

श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर नजरा

विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरची पहिल्या एकदिवसीय सामन्यात वर्णी लागली होती, मात्र पावसामुळे त्याला आपले कौशल्य दाखवता आले नाही. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ‘टीम इंडिया’ला चौथ्या स्थानाचा प्रश्न शेवटपर्यंत सुटला नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या क्रमांकावर श्रेयस अय्यर कसा खेळतो याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असणार आहेत. श्रेयसला दुसऱया लढतीत चांगली कामगिरी करून संघातील चौथे स्थान पक्के करण्याची मोठी संधी असेल.

उभय संघ 

हिंदुस्थान – रोहित शर्मा, शिखर धकन, किराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केदार जाधक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, भुकनेश्कर कुमार, कुलदीप यादक, मोहम्मद शमी. खलील अहमद.

वेस्ट इंडीज – ख्रिस गेल, इकिन लुईस, शाई होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), रोस्टन चेज, जेसन होल्डर (कर्णधार), फेबियन ऍलेन, कार्लोस ब्रॅथकेट, केमर रोच, शेल्डन कॉटरेल.