
मुंबईच्या महापौरपदाची धुरा 22 नोव्हेंबर 2019 रोजी खांद्यावर घेतल्यानंतर किशोरी पेडणेकर यांचा कार्यकाळ यशस्वी कोविड लढा आणि मुंबईच्या विकासाला प्राधान्य देणारा ठरला आहे. कोरोनाच्या दोन महाभयंकर लाटांमध्ये घराबाहेर पडणेही धोकादायक असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः मैदानात उतरून पालिका प्रशासनासोबत बरोबरीने काम केले. यशस्वी कोविड लढयासोबत मुंबईच्या विकासालाही प्राधान्य देण्यासाठी अविरत प्रयत्न केले.
मुंबई महानगरपालिकेत 97 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांना महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर काही महिन्यांतच मार्च 2020 मध्ये कोरोनाने मुंबईत शिरकाव केला. काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यामतून केल्या जाणार्या उपाययोजनांची त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला. यामध्ये त्यांना स्वतःलाही कोरोनाची लागण झाली. मात्र यावर त्यांनी मात करून पुन्हा लढाई सुरू केली. रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे जादा बिल, कोविड चाचण्यांसाठी लॅबकडून आकारण्यात येणारे जादा बिल कमी करण्यासाठी आणि अशा मुजोर लोकांना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना लढय़ासह मुंबईच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांसह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. लसीचा साठा करण्यासाठी कांजूरमार्ग येथे सुरू केलेल्या कोल्ड स्टोरेज सेंटरचा आढावा घेतला. विमानतळावर येणाऱया प्रवाशांची तपासणी, त्यांची व्यवस्था कोणत्या प्रकारे होते यावर लक्ष ठेवले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्याशी चर्चा करून कोविड योद्धा चतुर्थ श्रेणी कामगारांचा यथोचित सन्मान केला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी चर्चा करून कूपर रुग्णालयातील पंत्राटी कर्मचाऱयांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी समन्वय साधून वेळोवेळी काम केले. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी 50 वर्षांची गरज पूर्ण करणाऱया कोल्ड स्टोरेज सेंटर अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अशी राहिली उल्लेखनीय कामगिरी
- हॉटेल्सना सरप्राइज व्हिजिट देऊन व्यवस्थेची पाहणी.
- जम्बो कोविड सेंटरला वेळोवेळी भेट देऊन सूचना दिल्या.
- मुंबईतील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेट देऊन आढावा.
- कोविड लसीकरण पेंद्राना भेट देऊन पाहणी केली.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार अकादमीची पाहणी.
- आगीच्या अनेक घटनांमध्ये रात्री-अपरात्री घटनास्थळी धाव घेऊन आढावा.
- पालकांच्या संमती पत्रानंतर मुलांना शाळा प्रवेश देण्याचे निर्देश. पालकांशी चर्चा.
विकासकामांचा वेळोवेळी आढावा
- मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील पालिकेच्या महत्त्वपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी.
- महात्मा फुले मंडईच्या पुनर्विकास काम, गाळेधारकांच्या समस्या जाणून घेतल्या.
- नालेसफाई, ंिहदमाता, गांधी मार्पेट येथील कामाचा आढावा.
- सर्व इमारत दुर्घटना, मॅनहोल दुर्घटना ठिकाणी पाहणी करून सूचना दिल्या.
- क्लीन-अप मार्शलच्या गैरवर्तणूकीला आळा घालण्यासाठी निर्णय.
- दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये लहान बाळाचे प्राण वाचविणाऱया साक्षी दाभेकरच्या धाडसाबद्दल साक्षी दाभेकरला एक लाख रुपयांची मदत.
- खड्डय़ांचा प्रश्न निर्माण होताच आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे निर्देश.
- बेकायदा ज्वलनशील पदार्थाचा साठा करण्यार्यांवर कारवाईसाठी प्रयत्न.
- नाटय़गृहाचे भाडे चारशे रुपये तिकीट दरापर्यंत पाच हजार रुपये आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाला कोविड काळात महत्त्वपूर्ण दिलासा दिला.
- महापौरांच्या कार्याची दखल घेऊन ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ने सन्मानित केले.


























































