
सामना ऑनलाईन । मथुरा
बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आल्यानंतर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाहची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या कंट्रोल रूमला काल रात्री फोन करून श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह बॉम्बस्फोटने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक श्रावणकुमार सिंग यांनी सांगितले. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच मथुरेत येणाऱया वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे.

























































