
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये शुक्रवारी पहाटे चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. लष्कर व जम्मू कश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही शोधमोहीम सुरू केली होती.
Jammu and Kashmir: Police and security forces are carrying out an operation at Kakapora area in Pulwama district where an encounter is underway. Details awaited.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/53fOiiacJ1
— ANI (@ANI) April 2, 2021
गुरुवारी नौगाम भागात भाजप नेत्याच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाला होता. हा हल्ला करणारे दहशतवादी काकपोरामधील समबोरा गावात लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली. शुक्रवारी पहाटे या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.



























































