
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. मुंलुड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते असे समजते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’, ‘बोलविता धनी’, ‘उमज पडेल तर’, ‘राम राम पाव्हणं, टिंग्या, बोक्या सातबंडे, अगडबंब अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चित्रा नवाथे या त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये वृद्धाश्रमात आयुष्य व्यतीत करत होत्या, असे समजते.
चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर. कुसुम व त्यांची बहिण कुमुद यांनी 1945 साली मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. गदिमांनी कुसुम यांचे नाव कुसुमचे बदलून चित्रा केले. चित्रा यांचा विवाह प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथ यांच्याशी झाला होता.




























































