पालिका कर्मचऱयांसाठी स्वतंत्र रुग्णालय बांधा, पालिका सभागृहात शिवसेनेचा प्रस्ताव

रेल्वे, पोर्ट ट्रस्ट आणि ‘बीएआरसी’प्रमाणे पालिकेच्या कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे.

मुंबईकरांना अहोरात्र नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी पालिकेचे लाखो कर्मचारी काम करीत असतात. कोरोना काळात पालिका कर्मचाऱयांनी केलेल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड बँकेनेही घेतली आहे. याशिवाय मुंबईकरांना दैनंदिन सेवेबरोबरच अनेक आपत्तींमध्ये पालिका कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून बचावकार्य करीत असतात. त्यामुळे पालिका कर्मचाऱयांना कोणत्याही आजारात दर्जेदार आणि तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जेणेकरून पालिका कर्मचारी मुंबईकरांना आपली सेवा आणखी परिणामकारकतेने देऊ शकणार आहेत. यामध्ये पालिका कर्मचाऱयांना तपासणी, उपचार व चाचण्यांची सोय केल्यास कर्मचाऱयांचा कालापव्यय टळणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारावे आणि मोफत उपचार करावे अशी मागणी अनिल पाटणकर यांनी केली आहे. याबाबत पाटणकर यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या