गोवर रुबेला लसीकरणामुळे जिल्ह्यात तीन मुलांना सिरीयस रिअ‍ॅक्शन

129

राजेश देशमाने । बुलढाणा

गोवर रुबेला लस दिल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तीन शालेय विद्यार्थ्यांना सिरीयस रिअ‍ॅक्शन आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी ‘सामना’शी बोलताना दिली आहे.

मोठा गाजा-वाजा करुन शासनाने गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ काल मंगळवारी संपूर्ण राज्यभर करण्यात आला होता. बुलढाणा येथे सहकार विद्यामंदिरात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे व जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे यांचे हस्ते बुलढाणा जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. काल मंगळवारी सहकार विद्यामंदिरात ८१ मुलामुलींना ही गोवर रुबेला लस देण्यात आली. परंतु इयत्ता ९ वी मध्ये शिकणार्‍या विराट अरुण जवंजाळ या विद्यार्थ्याला या लसीचे सिरीयस रिअ‍ॅक्शन आले त्याला तत्काळ लद्धड हॉस्पिटल बुलढाणा येथे भरती करण्यात आले आता उपचारानंतर त्याची प्रकृती धोकाबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बुलढाणा तालुक्यातील मातला येथील जि.प. शाळेत शिकणार्‍या ८ व्या वर्गातील वैष्णवी बाबुराव कुंजरगे या विद्यार्थिनीला सिरीयस रिअ‍ॅक्शन आली असता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. व चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील जि.प. शाळेतील ६ वर्गात शिकणार्‍या पायल संजय पवार या मुलीला सुद्धा या गोवर रुबेला लसीचे रिअ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शन आले असता तिला चिखली येथील डॉ. खेडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

या दोन्हीही मुलींची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी ‘सामना’शी बोलताना दिली आहे. गोवर रुबेला लसीकरणामुळे मुलांना खाज येणे, मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, उलट्या होणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे पालकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या