
सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य मुंबईचे कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांनी गेले 38 वर्षे सरकारी सेवेत असताना वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी हातभार लावला. पहिल्या दिवसापासून ते राज्यात अधिकारी म्हणून ज्या ज्या ठिकाणी बदली झाली त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. सेवापूर्तीच्या अखेरच्या दिवशीसुद्धा वरळीमधील पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालय परिसरात विविध झाडे लावली. असे करून त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी शिवसेना माजी नगरसेवक अरविंद भोसले, अधिकारी रणजित हांडे, प्रमोद बनगोसावी, डॉ. नरसु पाटील, अनिल पनाड, सतीश आंबवडे, विश्वनाथ कमलापुरे, अनिल कानिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.



























































