सेशन कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदी ऍड. रवी जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाणी आणि सत्र न्यायालय, फोर्ट व दिंडोशी येथील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऍड. रवी प्रकाश जाधव विजयी झाले. निवडणुकीत एकूण 1409 वकिलांनी मतदान केले. त्यापैकी विक्रमी 795 मते मिळवून ऍड. जाधव यांनी सेशन कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षपद पटकावले.

बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी पार पडली आणि शनिवारी मध्यरात्री मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ वकील रामनाथ किणी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विशाल इंगवले, सचिवपदी आसिफ नाकवी, सहसचिवपदी अनिशा नारायणन, कोषाध्यक्षपदी शिवाजी बनकर आणि लेखापरीक्षकपदी अरविंद तरल विजयी झाले. तसेच कार्यकारी समिती सदस्य म्हणून अजय लाड, मनोज म्हात्रे, सुजित साटम, अर्जुन लिंगलोड, विनोद पांडये, अमित राणे, राहुल त्रिपाठी, विक्रांत नारकर, संदीप जंगम, सुनंदा नंदेवार हे विजयी झाले आहेत. आगामी काळात वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. रवी जाधव यांनी दिली.