
हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंडन समारंभाहून परतत असताना बुधवारी रात्री उशिरा मसरुंद-हमाल रोडवर बोलेरो वाहन दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात कळते. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कुठेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महाल गावातील रहिवासी काक्रोधा गावात मुंडन समारंभासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघातानंतर पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

























































