शहापूरच्या आदिवासी पाड्यात पाण्याच्या टाक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीषण पाणीटंचाईची दखल घेत प्रशासनाने तत्काळ ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या दहिगाव व फुगाळे येथील आदिवासी वाड्यांवर बसवल्या. या टाक्यांमध्ये टँकर पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे महिलांची फरफट थांबली आहे.

शहापूर तालुक्यातील अनेक दुर्गम गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासन आणि सामाजिक संस्थेच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. तसेच इतर पाड्यांवरही टप्प्याटप्प्याने पाण्याच्या टाक्या बसवण्यात येतील, असे आश्वासन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिले.