फ्रीजमधल्या जॅममुळे कळलं प्रियकराचं ‘लफडं’, शकिराने केला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध पॉप आणि रॉक सिंगर शकिरा हिने आपल्या माजी प्रियकराबाबत एक खुलासा केला आहे. गेरार्ड पिक या तिच्या प्रियकराने तिची फसवणूक करून दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवले होते. फ्रिजमधील जॅममुळे आपल्याला या प्रकरणाचा सुगावा लागल्याचं तिने म्हटलं आहे.

गेरार्ड पिक हा निवृत्त स्पॅनिश फुटबॉलपटू आहे. शकिरा त्याच्यासोबत नात्यात होती. पण, त्या नात्यात असताना त्याचे क्लारा चिया नावाच्या एका तरुणीशी संबंध होते. शकिराला या नात्याचा सुगावा तिला फ्रीजमधील स्ट्रॉबेरी जॅममुळे लागला. शकिरा दोन दिवस तिच्या घरापासून दूर होती. दोन दिवसांनी घरी आल्यानंतर तिला फ्रीजमध्ये अर्धवट रिकामी असलेली जॅमची बरणी दिसली.

गेरार्ड किंवा त्यांच्या दोन्ही मुलांपैकी कुणालाही जॅम आवडत नव्हता. त्यामुळे ती बरणी पूर्ण भरलेली असणं अपेक्षित होतं. पण, त्यातून जॅम काढून खाल्लेला दिसत होता. त्यावरून शकिराला आपल्या पश्चात घरात कुणीतरी राहून गेल्याचं समजलं.

अखेर, गेरार्ड आणि शकिराने विभक्त व्हायचा निर्णय घेतला. क्लारामुळेच या दोघांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या ब्रेकअपनंतर शकिराने आपल्या नात्यावर आधारित तीन गाणीही तयार केली.