Video – शरद केळकरने साकारला इकोफ्रेंडली बाप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनयाने मराठीसह बॉलीवूड गाजवणारा अभिनेता अशी शरद केळकर याची ओळख. गणेशोत्सवानिमित्त त्याच्यातील सुप्त गुण सर्वांनाच कळला आहे. नुकतीच त्याने घरच्या घरी बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारली आहे, तीदेखील अवघ्या दहा मिनिटांत.

लवकरच अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत. बाप्पा आला म्हणजे सजावट, आनंदी वातावरण, नैवेद्य आणि मोदक हे आलेच. परंतु या आधी सर्वात पहिला विचार अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे यंदाच्या वर्षीचा आपला बाप्पा कसा असायला हवा… असाच विचार शरद केळकरनेदेखील केला. यंदा आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असावी असे शरदने ठरवले होते, त्यानुसार त्याने घरच्या घरी स्वतःच बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारली आहे. यासाठी त्याला शिल्पकार, क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळे याचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘कडक मराठी’ यूटय़ुब चॅनेलवर हा व्हिडीओ पाहता येईल.