…या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशातील राजकारण तापले आहे. मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या 40 जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपच्या विचाराचे होते. भाजपनेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्यांचही, ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. आपल्या सैनिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजप सरकारवर आहे. मात्र, सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं , असे मलीक म्हणाले होते.