LIVE- शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pawar-ncp1

सामना ऑनलाईन, पुणे

  • राजकारणात मी भान ठेवून वागतो! पंतप्रधान बनणार का या प्रश्नावर शरद पवारांचे उत्तर
  • पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे – शरद पवार
  • राजू शेट्टी यांनी अधिकच्या ज्या जागा मागितल्या आहेत त्या काँग्रेसकडे मागितल्या आहे
  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांमध्ये मतैक्य झालेले आहे
  • आम्ही पुण्याच्या जागेची मागणी केलेली नव्हती-शरद पवार
  • मी राज ठाकरेंना आघाडीत या असे कधीही म्हटलेलो नाही
  • आमची यादी तयार आहे, काँग्रेसची यादी तयार झाली की एकत्रित यादी जाहीर करू
  • आम्ही कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली की आपल्या कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी
  • बहुजन वंचित आघाडी सोबत आघाडी करण्याच्या चर्चेत मी कधीच नव्हतो- शरद पवार
  • नगरची जागा आम्ही जिंकू शकतो
  • नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, नगरमधील 6 विधानसभा मतदारसंघातील 2 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि उर्वरीत ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दोन नंबरला आहोत.
  • निवडून येण्याची क्षमता असलेले आणि लोकमान्यता असलेले उमेदवार आम्ही निवडतो
  • यंदा कोणाची लाट आहे असं वाटत नाही
  • मी 14 निवडणुका आत्तापर्यंत लढलो आहेत, इतक्यांदा कधी चिंता वाटली नाही मग आता चिंता काय वाटेल?
  • ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल, तेव्हा कोण कुठून उमेदवार आहे हे सगळ्यांना कळेल
  • मावळची जागा आम्ही दोनदा घालवली आहे-शरद पवार
  • पक्षाकडून माझी उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही
  • मला माढातून निवडणूक लढवण्याबाबत आग्रह झाला होता- शरद पवार
  • पक्षांतर्गत वाद कमी करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणि कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न झाले
  • शरद पवार यांची पुणे येथे पत्रकार परिषद
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढातून निवडणूक न लढण्याची शक्यता