
सामना ऑनलाईन । पुणे
मी पंढरपूरला जाऊन पांडूरंगाचं दर्शन घेतो, पण त्याचा फोटो एखाद्या पेपरमध्ये यावा, ते मला आवडत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना जबरदस्त टोला हाणला.
आषाढवारीला सुरुवात झाली असून संत ज्ञानेश्वर- संत तुकाराम यांच्या पालख्यां पुण्यात मुक्कामी असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित यांनी त्यांचं दर्शन घेतलं. प्रसिद्धी माध्यमांमधून त्याचे व्हिडीओ-फोटो प्रसिद्ध करण्यात आले. याच पार्श्वभूमिवर पवार यांनी अमित शहा यांचं नाव घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
ह.भ.प. शामसुंदर सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना, ‘पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचं’, पवार म्हणाले.






























































