शुभारंभ! शेअर बाजाराने मरगळ झटकली, गुढीपाडवा ठरला लाभदायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market

गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाच्या प्रारंभी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. मंगळवारी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात चांगलीच घसरण झाली होती त्यामुळे मंगळवारच्या स्थितीकडे साऱ्यांचं लक्ष्य लागून राहिलं होतं. मात्र वर्षाचा पहिला दिवस गुंतणवणूकदारांसाठी चांगला ठरला आहे. शेअर बाजाराची सुरुवात 236.71 अंकांनी वधारत निर्देशांक 48,120.09 वर पोहोचला. तर निफ्टीतही 68.55 अंकांची उसळी पाहायला मिळाली.

बाजाराची सुरुवात होताच रिलायंस इंडस्ट्री, ICICI Bank, HDFC Bank, HDFC, लार्सन अँड टूब्रो, एसबीआय आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

सकाळी 10.31 वाजता निर्देशांकात 248.88 अंकांची म्हणजे 0.52% इतकी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आणि 48,132.26 स्तरावर बाजार सुरू होता. त्याचवेळी निफ्टी 14,385.15 स्तरावर होता. निर्देशांकात 74.35 अंक म्हणजे 0.52% इतकी तेजी पाहायला मिळाली.

जवळपास सर्वच विभागात वाढ पाहायला मिळत होती. निफ्टीत पीएसयू बँक निर्देशांकात 1.52 टक्के फायदा दाखवत होती. तर मेटल, प्रायव्हेट बँक, रिअॅल्टी, बँक, ऑटो आणि फायनेंशिअल विभागातील शेअर्समध्ये 0.8-1.2 टक्क्यांदरम्यान तेजी दिसत होती.