शीना बोरा हत्याकांड, पीटर मुखर्जीवर ऑन्जियोग्राफी

168

सामना प्रतिनिधी, मुंबई

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पीटर मुखर्जी याला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्याला सर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे ऑन्जियोग्राफी चाचणीत पीटरच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स असल्याचे आढळले.

जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑन्जियोग्राफीचा अहवाल विशेष सीबीआय न्यायालयात सादर केला. पीटरवर तातडीने ऑन्जियोप्लास्टी किंवा बायपास करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीटरला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्याच्या वकिलांनी विशेष न्यायाधीश जे. जी. जगदाळे यांच्याकडे केली. ती विनंती न्यायालयाने मान्य केली.

आपली प्रतिक्रिया द्या