शिर्डीच्या दोन पोलीस शिपायावर 40 हजारांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डी पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस शिपाई यांना 40 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीतील चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचेकडे काम करणारा मुलगा यांना शिर्डी पो स्टे कडील गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर, पोलीस शिपाई ब न 09, व विशाल पी . मैद, पोलीस शिपाई , ब न 1612, शिर्डी पोलीस स्टेशन, अहमदनगर वर्ग 3 यातील लोकसेवक यांनी दि 22/11/19 रोजी पंचा समक्ष 40000/- रु लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम पुणतांबा चौफुली येथे स्विकारण्याची तयारी दर्शवली होती , प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच.डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.394/2019 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन.1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दिपक करांडे हे करीत आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव येथील रहिवाशी तरुण सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती. त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात ती अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली असल्याची माहिती समजते.दरम्यान शिर्डीत दरम्यान शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते. त्यात हि प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडिल असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी केली होती.त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली या बाबत नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.

सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, आरोपीचे सक्षम अधिकारी मा पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दीपक करांडे, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि अहमदनगर, पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नगर, सहा. सापळा अधिकारी श्याम पवरे, यांचा पथकात समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दिपक करांडे हे करीत आहेत. याप्रकरणी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.