रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याला शिवभक्तांनी शिकवला धडा

2204

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी चांगला धडा शिकवला आहे. याचा व्हिडीओ एका शिवभक्ताने चित्रित केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडावर असणाऱ्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो लोक येतात. आपल्या महाराजांनी ज्या ठिकाणी आयुष्यातील काही क्षण व्यतित केले आहे तिथली माती कपाळाला लावून त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी अनेक शिवभक्त येथे रोज हजेरी लावत असतात. याच दरम्यान, काही मद्यपीही येथे घुटमळतात, त्यामुळे तेथील पावित्र जपले जात नाही अशी तक्रार करण्यात येते. अशा मद्यपींना शिवभक्त धडा शिकवतात आणि त्यांची दारू उतरवतात.

याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती दारू पिऊन रायगडावर धिंगाणा घालताना दिसत आहे. शिवभक्तांनी याचा जाब विचारल्यावर उद्धट उत्तर देणाऱ्या या पेताडाला शिवभक्तांनी चांगला धडा शिकवला. शिवभक्तांनी दारू पिऊन आलेल्याला गडावरून हाकलून देत चांगला चोप दिला आणि त्याची दारु उतरवली.

आपली प्रतिक्रिया द्या