किरीट सोमय्या तोंडावर आपटले, ‘त्या’ बांधकामाशी अनिल परब यांचा कोणताही संबंध नाही; म्हाडाचे लेखी उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पूर्व भागातीत एका अनाधिकृत बांधकाम प्रकरणी भाजपचे किरीट सोमय्या शिवसेना आमदार व माजी मंत्री ऍड. अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करत होते. हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले असून याचा ऍड. अनिल परब यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे लेखी उत्तर म्हाडाने दिले आहे. त्यामुळे खोटे आरोप करून दिशाभूल करणाऱ्या किरीट सोमय्यांची नौटंकी उघड झाली आहे.

किरीट सोमय्यांची नौटंकी उघड झाल्यानंतर ऍड. अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हाडाने दिलेले लेखी उत्तरही वाचून दाखवले. सदर अनाधिकृत बांधकामाशी आमदार अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही असे म्हाडाने आपल्या लेखी उत्तरामध्ये म्हटल्याचे ऍड. अनिल परब यांनी पत्रकारांसमोर कागद दाखवून वाचूनही दाखवले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून किरीट सोमय्या हे अनिल परब यांचे अनाधिकृत कार्यालय असल्याचे आरोप करत होते. मी वारंवार सांगत होतो की ही जागा माझी नाही, सोसायटीची आहे. सोसायटीचे ते कार्यालय आहे आणि ते कार्यालय वापरण्याची परवानगी सोसायटीने मला दिलेली आहे. किरीट सोमय्या करत असलेला आरोप खोटा असून या संदर्भात आता म्हाडानेही लेखी उत्तर दिले आहे. या जागेचा आणि अनाधिकृत बांधकामाचा माझा कुठलाही संबंध नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

म्हाडाने लेखी दिलेल्या उत्तरात पॅराग्राम क्रमांक एकमध्ये लिहिलेले आहे की, गांधीनगर वांद्रे पूर्व, येथील इमारत क्रमांक 57 व 58 या दोन इमारतीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामाशी आमदार अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही. याचा अर्थ किरीट सोमय्या जे कित्येक वर्ष खोटं बोलत आहेत, ज्यांच्यावरती मी अब्रुनुकसानीचा दावा केलाय त्याचा लेखी पुरावा म्हाडाने दिला आहे, असे ऍड. अनिल परब म्हणाले.

अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

– किरीट सोमय्या यांना मी जाब विचारात आहे. भाजपचं याला समर्थन आहे का?

– हा गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे. या सगळ्या लोकांना मी घेऊन पुढे येणार आहे.

– मी सोमैय्या यांच्या एकही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मी त्यांना मोजत नाही मला जी यंत्रणा विचारेल त्यांना मी उत्तर दिलं.

– एक शिवसैनिक म्हणून मी उतरलो आहे. हा लढा आक्रमक होणार आहे. ही आग त्यांना खाक करत राहिल.

– मला लेखी उत्तरात स्पष्ट पैकी लिहून आलेलं आहे की अनिल परब यांचा बांधकामशी संबंध येत नाही. किरीट सोमैय्या गेले कित्येक दिवस नौटंकी करत आहे.

– मी गरिबांसाठी आलो आहे. मी त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा ठोकला आहे. अशी अनेक पुरावे आहेत त्यामुळे किरीट सोमैय्या यांना नाक घासायला लागेल.

– आम्ही स्वतः लिहून दिलं की आम्ही हे बांधकाम तोडत आहोत. आम्ही त्या अधिकाऱ्यावर देखील दावा ठोकत आहोत.

– मी पोलिसांना आव्हान केलं होतं की त्यांना येऊ द्या, पण ते घाबरट आहेत, त्यांना नौटंकी करायची सवय आहे.

– रात्री येणं, ही बायकांची काम झाली. आम्ही मारायला नव्हतो उभे त्यांचं स्वागत करण्यासाठी उभे होतो. महिला त्यांना ओवाळायला उभ्या होत्या.

– हा लढा संपलेला नाही. या ऑर्डरच्या आधारावर ब्लॅकमेलर लोकांना घाबरवणार.

– शिवसेना सगळ्यांच्या पाठीशी उपस्थित आहेत. घरांवर हातोडा पडू देणार नाही.

– जो नियम साई रिसॉर्टला लागणार आहे त्याचं पाप किरीट आणि भाजपच्या माथी लागणार आहे.

– जे दबावाला बळी पडतात ते पक्ष बदलतात. मी बळी पडणार नाही.