मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकवणार! शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा निर्धार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या व हिंदुत्ववादी असलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांच्या विश्वासाला शिवसेनेने कधीही तडा जाऊ दिला नाही. आगामी महापालिकेची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लढविली जाणार असून कुठल्याही परिस्थितीत मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा निर्धार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

संभाजीपेठेतील शिवसेना भवन येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे बोलत होते. या बैठकीस मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख तथा प्रभारी जिल्हाप्रमुख त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खैरे म्हणाले की, आगामी महापालिकेची निवडणूक दोन ते तीन महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनपा निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर हे शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने भारावलेले असून हिंदुत्ववादी आहे. त्यामुळेच या शहरावर कायम शिवसेनेचा भगवा फडकत आहे. शिवसैनिकांनी मनपा निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागावे, घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधावा, शिवसेनेचे विचार त्यांना पटवून द्यावेत, त्यांच्या मदतीसाठी सदैव तयार असल्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करावा, असे खैरे म्हणाले.

उपजिल्हाप्रमुख गिरजाराम हाळनोर, संतोष जेजूरकर, संतोष खंडके, विजय वाघमारे, बाबासाहेब डांगे, हिरालाल सलामपुरे, श्रीरंग आमटे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक सीताराम सुरे, मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, आत्माराम पवार, कमलाकर जगताप, सुभाष शेजूळ, किशोर नागरे, वीरभद्र गादगे, विनोद लोखंडे, नारायण जाधव, बापू कवळे, मकरंद जहागीरदार, बंटी जैस्वाल, कान्हुलाल चक्रनारायण, गणेश लोखंडे, आशिष लकडे, नितीन झरे पाटील, दिनेश राजेभोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आशा दातार, दुर्गा भाटी, सुकन्या भोसले, वैशाली आरट, सुनीता सोनवणे, सुनिता औताडे, रुपाली मुंदडा, नलिनी बाहेती, रेणुका जोशी, लता संकपाळ, मीना फसाटे, भागूअक्का शिरसाट, रामदुलारी बावरिया, रोहिणी काळे, सुनीता शिरसाट आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.