जय श्रीराम! ‘ख्रिसमस ट्री’ऐवजी मॉलमध्ये धनुष्य आणि गदा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेची ताकद आणखीनच वाढली आहे. अयोध्या दौऱ्यानंतर सर्वच स्तरांतून शिवसेनेची प्रशंसा होत आहे. त्याचे पडसाद समाजामध्येही उमटताना दिसत आहेत. पाश्चिमात्यांचे अनुकरण करणारे मॉलवालेही शिवसेनेच्या प्रभावापासून दूर नाहीत.

एरवी ख्रिसमस ट्रीने सजावट करणाऱ्या मॉलवाल्यांनी आता श्रीरामाचा धनुष्यबाण आणि हनुमंताच्या गदेच्या भव्य प्रतिकृती उभारल्या आहेत. ‘ही पहा शिवसेनेची ताकद’ अशी प्रतिक्रिया या प्रतिकृती पाहून मुंबईकरांमध्ये उमटू लागल्या आहेत. कदाचित या प्रतिक्रिया कानावर पडल्याने भाजपवाल्यांनीही शिवसेनेचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे. येत्या शनिवारी भाजपाच्या वतीने मुंबईत ठिकठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर विश्व हिंदू परिषदेनेही येत्या डिसेंबरमध्ये मुंबईत धर्म परिषदेचे आयोजन केल्याची माहिती आहे.