
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कन्नड भाषा बोलणाऱया अक्कलकोट, सोलापूर या गावांचा समावेश कर्नाटकमध्ये करण्याच्या मागणीचा दावा निरर्थक असून, अक्कलकोट, सोलापूर महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी केली.
नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱहे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड उपस्थित होते.
महाराष्ट्रात अक्कलकोट, सोलापूरसारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक स्थलांतरित नागरिक राहत आहेत आणि आता हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग बनले आहेत. न्यायालयात या प्रश्नाकर सुरू असलेली चौकशी आता ऐरणीवर आली असताना स्वतŠकडील लंगडी बाजू लपविण्यासाठी कर्नाटकने अशाप्रकारे विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अशी उलटसुलट विधाने करून जनतेची दिशाभूल करणे, ही केंद्र सरकारच्या कामाची पद्धत असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका डॉ. नीलम गोऱहे यांनी केली.
डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या, ‘समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. पाकिस्तानदेखील अशाप्रकारे काम करताना दिसत आहे. दररोज एक चौकी काबीज करून हा पाकिस्तानचा भाग आहे, असे म्हणण्यासारखे वक्तव्य कर्नाटक सरकार करीत आहे. याकरिता केंद्राने केळीच कर्नाटकला चाप लाकण्यासाठी पावले उचलावीत. तसे होणार नसेल, तर महाराष्ट्रदेखील यावर प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. या प्रश्नाकर केंद्र सरकार दोन्ही हातात लोण्याचा गोळा ठेकण्याचा प्रयत्न करीत आहे. एका बाजूला कर्नाटक सरकारमधील जनतेची मते मिळकायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेलादेखील बेळगाव तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगून काहीतरी आश्वासने द्यायची.’ केंद्राकडून याबाबत राजकारण सुरू असल्याची टीकाही डॉ. गोऱहे यांनी केली.
राज्यपालांच्या भूमिकेबाबत डॉ. गोऱहे म्हणाल्या, ‘यापूर्वीही त्यांनी महात्मा फुले यांच्याबाबतचे केलेले वक्तव्य हे अज्ञानातून केले होते. त्यांच्या मनात हे विचार कसे येतात असा प्रश्न पडतो. राज्यपालांच्या वक्तव्यावर सर्व स्तरांतून नाराजी आहे. त्यामुळे अशा व्यक्तींबाबत केंद्र सरकारने विचार करायला हवा’, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेनंतर डॉ. नीलम गोऱहे यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन माहिती घेतली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे उपस्थित होते.
‘सेफ कॅम्पस’ योजना राबवणार
z शाळा, महाविद्यालयांमध्ये मुली सुरक्षित राहाव्यात, यासाठी ‘सेफ कॅम्पस’ योजना राबवण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत. मुलींची छेडछाड झाल्याच्या तक्रारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून देता येतील, तसेच भरोसा सेलचे काम डीवायएसपी स्तरावर सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत, असे डॉ. गोऱहे यांनी सांगितले.
‘शक्ती कायद्या’साठी खासदारांनी केंद्राकडे रेटा द्यावा
z ‘शक्ती कायदा’ हा महाराष्ट्र सरकारने मंजूर केला असून, त्याचा मसुदा केंद्र सरकारकडे गेला आहे. या संदर्भामध्ये मी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. आता महाराष्ट्रातील खासदारांनी याबाबत एकत्रितपणे केंद्रामध्ये आवाज उठवला पाहिजे. ‘शक्ती कायदा’ लागू झाल्यावर महिलांवर होणाऱया अत्याचाराला आळा बसेल, असेही डॉ. गोऱहे यांनी यावेळी सांगितले.


























































