
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवल्याविरोधात शिवसेनेकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
” निवडणूक आयोगाने अत्यंत घाईने हे सर्व केलं. आता या सर्व गोष्टी आम्ही दिल्ली उच्च न्य़ायालयासमोर मांडल्या आहेत. हा निर्णय घेताना केलेली घाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या. अशी आशा आहे की दिल्ली उच्च न्यायलय याबाबत योग्य ते निर्देश देईल. दिल्ली उच्च न्यायलय यावर सखोल विचार करून निर्णय देईल”, असे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.



























































