नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक – शिवसेनेचा जनतेशी संवाद सुरु, बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रभागनिहाय बैठका घेत जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या या बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूकं 29 डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रभागनिहाय बैठका आयोजित करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून रत्नागिरी शहरात झालेली विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या प्रभागनिहाय बैठकामधून शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत.

कोकणनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी जनतेशी संवाद साधला. रत्नागिरी शहरात झालेली विकासकामे आणि भविष्यातील विकासकामांबाबत त्यांनी नागरिकांसोबत चर्चाही केली. यावेळी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपशहरप्रमुख प्रशांत साळूंखे, महिला शहर संघटक मनिषा बामणे, शहरसंघटक प्रसाद सावंत, युवासेना शहर युवाधिकारी अभिजीत दुडये, केतन शेट्ये, नगरसेवक राजन शेट्ये, राजेश्वरी शेट्ये, शिल्पा सुर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.