
मुंबईतील उद्योग-रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र आणि आशिया खंडातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘टीडीआर’ घोटाळा करून ‘अदानी’च्या घशात घालण्याचा ‘मिंधे’ सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धारावीकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. धारावीकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 16 डिसेंबर रोजी ‘अदानी’च्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयावर लाखोंचा सर्वपक्षीय महामोर्चा धडकणार आहे. या मोर्चाचा आज टीझर रिलीज करण्यात आला. हा टीझर सध्या तुफान गाजत आहे.
धारावी धारावीकरांचीच,
मुंबईकरांच्या हक्काची!#धारावीविराटमोर्चा pic.twitter.com/Gg2fU1GI0m— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 15, 2023



























































