
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ‘मातोश्री’ निवासस्थानी ‘ShivsenaUBT’, ‘Office Of Uddhav Thackeray’ आणि ‘Aaditya Thackeray’ या तीन व्हॉट्सऍप चॅनेलचे लाँचिंग करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे विचार, घडामोडी, कामे, आंदोलने, घटना आणि घडामोडींची माहिती आता काही क्षणात सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते.
मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची समशेर उपसली. ही समशेर गाजवण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. शिवसेनेकडून वेळोवेळी सभा, आंदोलने आणि सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या योजना, घोषणांची पोलखोल करण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’सारखी मोहीम राज्यभर राबवली जात आहे. शिवसेनेकडून सुरू असलेल्या या सर्व कामे, आंदोलने, मोहिमांची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज तीन व्हॉट्सऍप चॅनेल्स सुरू करण्यात आली. यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे आणि शिवसेना महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अनघा आचार्य, मयूर कांबळे, भूमिष सावे, अनुज म्हात्रे, पराग मोहिते, अमित भद्रीचा, अमित पंडित आदी उपस्थित होते.
व्हेरिफाईड चॅनेल्स
शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेली ही तीनही चॅनेल्स मेटाकडून व्हेरिफाईड करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या तीनही चॅनेल्सला अधिकृत चॅनेल्स असल्याची निळय़ा रंगाची टिक देण्यात आली आहे. या चॅनेल्सकडून अस्सल माहिती सर्वांना मिळणार आहे.

चॅनेल्सची लिंक पुढीलप्रमाणे आहे
Shivsena UBT : https://whatsapp.com/channel/0029VaBHsoJFCCocdqcqHT2Y
Office Of Uddhav Thackeray : https://whatsapp.com/channel/0029Va6NA2p23n3mFx4GpR3N
Aaditya Thackeray : https://whatsapp.com/channel/0029Va6gTAsHFxP4RvWAUn2q



























































