आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने विक्रोळीत अविनाश धर्माधिकारी यांचे करीअर मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढाकार घेतला आहे. दहावी-बारावीनंतर काय असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. त्यांना उत्तम करीअरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमदार राऊत यांनी चिंतामणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर – 2 येथील विकास हायस्कूलच्या सभागृहात येत्या 2 जून रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळात हे व्याख्यान होणार आहे. वेळेवर मार्गदर्शन न मिळाल्याने करीअरबाबत काय निर्णय घ्यावा याबद्दल विद्यार्थी आणि पालक संभ्रमात असतात. त्यांच्या शंकांचे निरसन या व्याख्यानातून होईल. दहावी-बारावीनंतर कोणते शिक्षण घेऊ शकता? कार्यक्षमतेनुसार कोणत्या क्षेत्राची करीअर म्हणून निवड करू शकता? व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करू शकता? या प्रश्नांची उत्तरे या व्याख्यानातून मिळतील.