
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्याच्या तालुकाप्रमुखपदी कमलाकर कदम यांची तर राजापूर विधानसभेच्या विधानसभा समन्वयकपदी प्रकाश कुवळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.





























































