
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
केंद्र-राज्य सरकारने शेकडो योजना जाहीर केल्या, या योजनांची मोठी जाहिरातबाजी केली, प्रत्यक्षात मात्र किती नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाला? या योजनांची अंमलबजावणी होत आहे का? हे पाहण्यासही कोणाला वेळ नाही शिवसेनेने सत्यशोधन आंदोलनाच्या माध्यमातून याची खरी माहिती मिळवली असता या योजना फसव्या आहेत, हे समोर आले असून, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. शिवसैनिकांनी हा भाजप सरकारचा नाकर्तेपणा घरोघरी जाऊन जनतेसमोर मांडावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले.
भगवा तर फडकवणारच या मोहिमेच्या माध्यमातून रांजणगाव शेणपुंजी येथे बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, जिल्हा युवा अधिकारी संतोष माने, नवले पाटील, विभागप्रमुख कैलास हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपविभागप्रमुख बबन पठाडे, कर्डिले, सरपंच अमोल लोहकरे, प्रवीण दुबिले, ग्रा.पं.सदस्य शिवराम ठोंबरे, सूर्यभान काजळे, गजानन बोंबले, डॉ. सुरासे, गजानन रावळकर, लक्ष्मण साध्ये पाटील, उपशहरप्रमुख प्रदीप सवई, भगवान साळुंके, जावेद शेख, शाखाप्रमुख सुरेश रहाणे, राजेश उणवणे, अमोल तरटे, किशोर मोरे, बाबासाहेब शिरसाट, ईश्वर वाघचौरे, गणेश काकडे, गटप्रमुख नीलेश शिंदे, रामेश्वर कबाडे, गायके पाटील, नामदेव येवले, अर्जुन जाधव, संतोष गुंजकर, साईनाथ गवळी, युवासेनेचे निखिल कोळेकर, गणेश तेजनकर, गणेश साखरे, राहुल भोसले, आकुस्कर पाटील, भाविसेचे योगेश म्हस्के, रवी गायकवाड, प्रवीण जाधव, गणेश काळे, संदीप गवळी, शाहरुख शेख, धनंजय गवाले, योगेश शिंदे, शाहरुख शहा, योगेश वाघ, संदीप आर्दड, तेजस सुक्रे, नितीन सोनवणे, महेश हेमके, आकाश तरकसे, योगेश लोहकरे, शुभम पंडित, सुनील चव्हाण, राजू ढोकणे, सचिन वाघ, आनंद साळुंके आदी शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगापूर तालुक्यात सिद्धी सिरसगाव या ठिकाणी झालेल्या बैठकीप्रसंगी विभागप्रमुख नंदू सोनवणे, वाल्मीक सोनवणे, दत्ता सोनवणे, शरद सोनवणे, गणेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, उत्तम अवसरमल, संतोष सोनवणे आदी शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिवराई येथील बैठकीप्रसंगी उपतालुकाप्रामुख मनोज पिंपळे, वाळूज शहरप्रमुख नंदकुमार राऊत, विभागप्रमुख बाळासाहेब चनघटे, उपविभागप्रमुख देवेंद्र चव्हाण, शाखाप्रमुख नाथा पाटील शेळके, बद्रीनाथ चनघटे, गणेश देवकर, विश्वनाथ थोरात, महिला आघाडीच्या अनिता, शिवनंदा घुगे, शकुंतला साबळे आदी शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही
पीककर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आज शुक्रवारी तालुक्यातील बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिला.
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आज तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिकांबरोबर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संबंधी चर्चा केली. तसेच बँक व्यवस्थापकांना शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन तातडीने कर्जपुरवठा करण्याच्या सूचना सूत्रांनी केल्या.
याप्रसंगी जिल्हा युवाधिकारी संतोष माने, तालुकाप्रमुख राजू वरकड, माजी तालुकाप्रमुख किशोर कुकलारे, विधानसभा संघटक गणेश अधाने, मुक्तेश्वर खंडागळे, विजय शिंदे, दीपक खोसरे, जगदीश चंद्रटिके, शहरप्रमुख रवींद्र तंबारे, विष्णू फुलरे, नगरसेवक नरेंद्र साळुंके, मनोहर लाळे, फकीरचंद्र काळे, शशिकला बारगळ, जयश्री साळुंके, पुष्पा फुलरे, पवन दांडेकर, मुकेश मालोदे, गणेश वाकळे, अतिश देवगिरीकर, नानासाहेब चव्हान, मयूर कुलकर्णी, गोकुळ गवळी, गुलाब कुचे, काकासाहेब आधाने, राजू भवर, सुनील भोसले, सुधाकर दहीवाल, उमेश जैस्वाल, विभागप्रमुख विजय चव्हाण, एकनाथ खोसरे, साईनाथ मातकर, बाळू खुटे, आकाश हिवर्डे, गणेश श्रीखंडे, अरुण गोलार, पोपट बारगळ, पोपट वेताळ आदी पदाधिकारी, गटप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.

























































