
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता संजय दत्त याच्या चरित्रावरील ‘संजू’ या चित्रपटाची सध्या चांगलीच हवा तयार झाली आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील चढउतार दाखविण्यात आले आहेत. संजय दत्तच्या जीवनातील सगळ्यात कठीण काळ होता तो मुंबई बॉम्बस्फोटात अडकल्याचा. मात्र तिथून बाहेर पडल्यावर संजय दत्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाला आणि तिथूनच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यामुळेच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की, या चित्रपटात शिवसेनाप्रमुख दिसणार का? त्यांची भूमिका नक्की साकारणार तरी कोण?
मुंबईत झालेल्या १९९३ च्य साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी संजय दत्तचे नाव पुढे आले होते. त्यामुळे पोलिसांनी संजय दत्तच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एके ४७ सापडल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. यानंतर तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्त ‘मातोश्री’वर दाखल झाला होता. यावेळी सोबत संजय दत्तचे वडील सुनील दत्त देखील मातोश्रीवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेतानाचा त्याचा फोटो दुसऱ्या दिवशी देश-विदेशातील सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्यापानावर छापून आला होता.
‘संजू’ चित्रपटात कोण कोणत्या भूमिकेत दिसणार हे कलाकार
बाळासाहेबांच्या आजारपणाच्या काळात संजय दत्त त्यांची आपुलकीने चौकशी करायचा. तो मातोश्रीवर नंतर भेटण्यासाठी आला तेव्हा, ‘बाळासाहेबांनी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला मदत केली आहे. ते म्हणजे माझ्या आयुष्यातील मोठा आधार’, अशी प्रतिक्रिया संजय दत्तने दिली होती.
त्यामुळे संजय दत्तच्या चित्रपटात हा भाग दिसणार का? याकडे मीडियाचं लक्ष लागलं आहे. तसेच बाळासाहेबांच्या भूमिकेत कोण दिसणार? की शिवसेनाप्रमुखांची भूमिका थेट न दिसता केवळ ‘बॅक व्ह्यूव’मधून साहेब पाहायला मिळाणार अशी उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.
‘ठाकरे’ चित्रपटाचा टीझर सुपरडुपर हिट, काही तासांत लाखो हिट्स
याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जीवनाच्या जवळ जाणाऱ्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते. त्यानंतर आता चित्रपट निर्माते संजय राऊत यांच्या आगामी ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दिकी झळकणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात ‘संजू’ चित्रपटाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून याबाबतीत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे.
‘संजू’ चित्रपटाचा ट्रेलर



























































