वाशिम जिल्हय़ातील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाशिम जिल्हय़ातील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हा युवती अधिकारी ः प्रिया महाजन. उपजिल्हा युवती अधिकारी ः प्रीती जाधव (वाशिम-मंगरूळ), श्वेता गवळी (रिसोड मालेगा), रविता भवालं (कारंजा मानोरा). तालुका युवती अधिकारी ः माधुरी चतुर (मानोरा तालुका), सोनाली काठोये (कारंजा तालुका), नंदा कांबळे (रिसोड तालुका), रेणुका राऊत (मंगरूळ तालुका), राखी वानखेडे (वाशिम तालुका), वनिता भुसारी (मालेगाव तालुका).