
सामना प्रतिनिधी । पेण
पेण येथील गांधीमंदीर वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित शिवसेना-युवासेना दहीहंडीचे मानकरी पवनपुत्र गोविंदा पथक पालखार ठरले. यांनी सहा थर रचून ही मानाची हंडी फोडली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार राजिप सदस्य किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख रायगड तथा पंचायत समिती सदस्य नरेश गावंड, माजी शहरप्रमुख अशोक वर्तक महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, योगिता वर्तक, अॅड.विकास म्हात्रे, वासुदेव म्हात्रे,नाशिकेत पाटील,कांतीलाल म्हात्रे, रवींद्र पाटील, तुकाराम म्हात्रे, अच्युत पाटील, श्रीतेज कदम, नरेश सोनवणे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर जैन म्हणाले की, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून पेण तालुक्यात विविध प्रकारचे समाज उन्नतीचे विकासात्मक कामे सुरू आहेत. शिवसेना पेण तालुक्याचा विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. युवासेना उपजिल्हाधिकारी आशिष वर्तक, ग्रामपंचायत सदस्य कणे धिरज पाटील, आंबेघर शाखाप्रमुख हर्षद पाटील, निलेश म्हात्रे, जय पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फारच उत्तमरित्या हंडीचे आयोजन केल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले यावेळी मित्र गोविंदा गडब, शिवसाई गोविंदा पथक चेंबूर, श्री चौंडेश्वरी गोविंदा पथक (वरवटणे),श्री दत्ता गोविंदा पथक (चेंढरे),पवनपुत्र गोविंदा पथक (पालखार)यांनी 6 थर लावून सलामी दिली.
सलामी लावणाऱ्या संघाना दोन हजार रुपये रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये पवनपुत्र गोविंदा पथक पालखार यांना एक नंबरचे पारितोषिक देण्यात आले. 11 हजार 111 रुपये व ट्रॉफी किशोकिशोर जैन यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.































































