
सामना ऑनलाईन । मुंबई
पालिकेच्या सहा विशेष समित्यांवर पुन्हा एकदा शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या उमेदवारांनी पालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे अर्ज सादर केले. या समित्यांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी विरोधकांनी अर्जच भरले नसल्याने गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पालिकेच्या चार वैधानिक समित्यांसाठी शिवसेनेकडून सोमवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आज स्थापत्य समिती शहर, स्थापत्य समिती उपनगरे, बाजार क उद्यान समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, विधी क महसूल समिती आणि महिला क बालकल्याण समिती अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत ‘भाजप’ने शिवसेनेला आधीच पाठिंबा दिला आहे. आज शिवसेना उमेदवार अर्ज सादर करताना भगवे झेंडे, भगवी उपरणी आणि ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुखांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना-भाजप युतीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणांमुळे पालिकेत भगवे वातावरण तयार झाले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, अर्चना भालेराव, समाधान सरवणकर, समीक्षा सक्रे, हाजी मोहम्मद हलीम खान, सचिन पडवळ, ऍड. सुहास वाडकर, दत्ता पोंगडे, माधुरी भोईर आदी उपस्थित होते.
अध्यक्षपदाचे उमेदवार
- स्थापत्य समिती शहर – प्रीती पाटणकर
- स्थापत्य समिती उपनगरे – उपेंद्र साकंत
- बाजार क उद्यान समिती – उमेश माने
- सार्कजनिक आरोग्य समिती – अमेय घोले
- महसूल व विधी समिती – शीतल म्हात्रे
- महिला क बालकल्याण समिती – हर्षला मोरे
उपाध्यक्षपदाचे उमेदवार
- स्थापत्य समिती शहर – दत्ता नरवणकर
- स्थापत्य समिती उपनगरे – दिनेश कुबल
- बाजार, उद्यान – ऋतुजा तारी
- सार्वजनिक आरोग्य – राजराजेश्वरी रेडकर
- विधी समिती – दीपमाला बडे
- महिला व बालकल्याण – उर्मिला पांचाळ
आज वैधानिक समित्यांची निवडणूक
पालिकेच्या चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी 3 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव, सुधार समितीसाठी सदानंद परब, शिक्षण समितीसाठी अंजली नाईक आणि ‘बेस्ट’ समितीसाठी अनिल पाटणकर यांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, चारही वैधानिक समित्यांसाठी विरोधकांनी अर्ज दाखल केला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




























































