मोठी बातमी – व्हाईट हाऊसबाहेर अंदाधुंद गोळीबार; हल्लेखोर ठार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी त्रुटी निर्माण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी व्हाईट हाऊसजवळ अज्ञात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना घडली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हाईस हाऊसमध्ये उपस्थित होते. व्हाईट हाऊस किंवा डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या परिसरात गोळीबार होण्याची महिन्याभरातील ही तिसरी घटना असून यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सिक्रेट सर्व्हिसने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. नासिर बेस्ट (वय – 21) असे हल्लेखओराचे नाव असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नेमके काय घडले?

सिक्रेट सर्व्हिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 17 व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया एव्हेन्यूच्या परिसरात एक संशयास्पद तरुण आला. त्याने अचानक आपल्या बॅगमधून बंदूक काढली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने एकामागोमाग एक 30 राऊंड फायर केले. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याने सिक्रेट सर्व्हिसने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ट्रम्प तात्या म्हणतात, मला हुकूमशहा म्हणा पण मूर्ख म्हणू नका… लय वाईट वाटतं

पत्रकारांची धावपळ

गोळीबाराचा आवाज ऐकताच व्हाईट हाऊस परिसरात काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये प्रचंड घबराट पसरली. त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने प्रेस ब्रीफिंग रूममध्ये आश्रय घेण्यास सांगण्यात आले. ‘एबीसी न्यूज’च्या वरिष्ठ व्हाईट हाऊस वार्ताहर सेलिना वांग या घटनेच्या वेळी तिथेच उपस्थित होत्या. त्या एका बातमीचे रेकॉर्डिंग करत असतानाच अचानक गोळ्यांचा प्रचंड आवाज आला. त्यांनी प्रसंगावधान राखत खाली वाकून स्वतःचा बचाव केला. त्यांच्या मोबाईलमध्ये हा सगळा थरार कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ट्रम्प सुरक्षित

बाहेर गोळीबाराचा थरार सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. परंतु ते सुरक्षित असल्याचे कळते. मात्र या कारवाईदरम्यान तिथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला गोळी लागली आहे. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही गोळी हल्लेखोराची होती की सिक्रेट सर्व्हिसची याचा तपास सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा कट उधळला; इराणच्या अल-सादीला तुर्कीयेत बेड्या, कशाचा बदला घेणार होता?