बैठे काम करताय.. काही गोष्टी सांभाळा .. फिट राहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्यापैकी प्रत्येकालाच दिवसभर संगणकासमोर बसून आपले काम करावे लागते, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांमध्ये केवळ लठ्ठपणाची समस्याच दिसून येत नाही, तर त्यांना मानदुखी, डोळ्यांच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, स्वत:ला अधिक निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे काम आणि आरोग्य स्मार्ट पद्धतीने करण्याची गरज आहे.

1) सक्रिय जीवनशैली अंगीकारणे-

दिवसाचा बराचसा वेळ एकाच जागी बसून जातो. ज्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसता. तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर सक्रिय जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करा. सकाळी थोडे लवकर उठून व्यायाम करा आणि ऑफिसमध्येही शक्यतो जिने वापरण्याचा प्रयत्न करा.

2) पाणी जवळ ठेवा-

पाणी शरीरासाठी अमृतापेक्षा कमी नाही. यामुळे आपली अतिरिक्त भूक कमी होते. परंतु शरीराच्या चांगल्या कार्यास मदत करते. आपल्या कामाच्या टेबलावर पाणी ठेवा, आणि वेळोवेळी पाणी प्या.

3) स्नॅक्सही बॅगेत ठेवा-

ऑफिसला आल्यावर आपण सर्वजण आपल्या बॅगेत फक्त पॅक केलेले लंच ठेवतो. पण मधेच जेव्हा खूप भूक लागते, तेव्हा आपण काहीही बाहेरचे खातो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे दुपारच्या जेवणासोबत काही हेल्दी स्नॅक्स तुमच्या बॅगमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते. उदाहरणार्थ भाजलेले दाणे, एखादे फळ, चीज स्लाईस, गुळ तूप घालून पोळीचा रोल.

4) चहा घेणे टाळा –

ऑफिसमध्ये असताना आपण चहा किंवा कॉफीचे वारंवार सेवन करतो. चहा किंवा कॉफी घेतल्याने नक्कीच बरे वाटते. पण चहा किंवा कॉफीचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. कॅफिनच्या अतिरेक सेवनामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. एवढेच नाही तर त्याचा एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत लिंबू पाणी, ताक किंवा सरळ साधे पाणी प्यावे.