ऐरोली सेंटरमध्ये पाहायला मिळणार ४२ फुटांचा व्हेल 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । नवी मुंबई

समुद्रातील जीवसृष्टी कशी असते हे पाहण्याची इच्छा अनेकांना असते. ही अद्भूत सागरी जीवसृष्टी पाहण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असे नाही. सागरी जगत अनुभवता नाही आले म्हणून काय झालं ? त्यातील महाकाय व्हेलचे दर्शन आपण प्रत्येक्ष घेऊ शकतो. ही किमया घडवणार आहे, राज्य वन विभाग. उरण किनाऱ्याजवळ गुरुवारी एक भला मोठा व्हेल मासा वाहून आला होता. त्याला सुरक्षित कसे हलवता येईल यासाठी, मॅनग्रोव्ह सेलमधील वन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सुद्धा पाहणी केली आणि हा महाकाय व्हेल ऐरोली सेंटरमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले.

एका वृत्तपत्राला बोलताना, मॅनग्रोव्ह सेलचे सहाय्यक वनसंरक्षक मकरंद घोडके यांनी सांगितलं की, सद्या हा व्हेल उरण किनाऱ्याजवळील खडकांवर आहे. तसेच वजन ही अजून एक अडचण आहे. त्यामुळे या व्हेलच्या मृतदेहाला हलवणे शक्य होणार नाही. म्हणून त्याचा मृतदेह दहन करून त्याच्या हाडाचा सांगाडा ऐरोली सेन्टरमध्ये प्रदर्शनात ठेवणार आहे.

हा एक निळा देवमासा असून यांचे तोंड हे मोठे व यू आकाराचे आहे, असे सागरी जीवशास्त्रज्ञ धनश्री बागडे यांनी सांगितले. तसेच, त्यांचा पेशी अभ्यासासाठी प्रयोगशाळेत नेल्या असून काही दिवसात अजून काही खुलासे होण्याची शक्यता आहे. मृत देवमाशावर सागरी जीवशास्त्रज्ञ व सहाय्यक वनसंरक्षक (मॅनग्रोव्ह सेल) यावर आणखी अभ्यास करत आहे.