
राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने पात्र शिधापत्रिकाधारकांना क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिह्यात स्मार्ट शिधापत्रिकेचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाईल. व्रेडिटकार्डच्या आकाराची ही स्मार्ट कार्ड असतील. त्यामुळे नजीकच्या काळात कागदी शिधापत्रिका इतिहासजमा होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विभागाने पहिल्या टप्प्यात प्राधान्य पुटुंब योजना आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी स्मार्ट शिधापत्रिका तयार केल्या आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून ते 26 जानेवारी 2027 या दरम्यान नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिह्यातील लाभार्थ्यांना या शिधापत्रिकांचे वितरण होईल. या वितरण मोहिमेला ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम’ असे नाव देण्यात आले आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या जयंतीदिनी नाशिकमधील येवला येथे या स्मार्ट शिधापत्रिकांच्या प्रतिपृतीचे अनावरण केले. त्यानंतर विभागाने स्मार्ट शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम निश्चित केला. लाभार्थ्यांना या स्मार्ट शिधापत्रिका निःशुल्क उपलब्ध केल्या जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत राज्यातील 1 कोटी 70 लाख पुटुंबांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला केशरी आणि पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका स्मार्ट शिधापत्रिकांमध्ये बदलल्या जातील.
धान्याची माहिती मिळणार
स्मार्ट शिधापत्रिकेवरील शिधावाटप दुकानातील धान्य पुठून आले, याची माहिती लाभार्थी धान्याच्या गोणीवरील क्यूआर कोड स्पॅन करून घेऊ शकतो. मिळालेले धान्य खराब असेल किंवा त्याचा दर्जा योग्य नसेल तर लाभार्थीला धान्य परत करता येईल तसेच त्याची तक्रारसुद्धा नोंदवता येईल.




























































