चर्चा दीड लाखाच्या भाजीच्या पिशवीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात लक्झरी ब्रॅण्ड फॅशनच्या नावाखाली महागडय़ा वस्तू विकण्याचा ट्रेंड आहे. अगदी सुमार वस्तूंना लाखमोलाचा टॅग लावला जातो. एका नामांकित ब्रॅण्डने भाजीची पिशवी चक्क दीड लाख रुपये किमतीत विक्रीला ठेवली आहे. त्यामुळे ही लाखमोलाची पिशवी चांगली चर्चेत आली आहे. ही बॅग आणि तिची किंमत बघून नेटिझन्सला धक्का बसला आहे. स्थानिक मार्केटमध्ये 150 रुपयांत अशा बॅगा मिळतात, असा टोला नेटिझन्स लगावत आहेत. भाजीला जाण्यासाठी कुणी एवढी महागडी पिशवी वापरतं का, असा सवालही केला जात आहे. आमच्या आई, आजी आणि काकू यांच्याकडे अशा पिशव्यांचे बरेच कलेक्शन आहेत, अशा शब्दांत फिरकी घेतली जात आहे.