पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर शिवसेना आघाडीवर; 13 पाण्याचे टँकर, 5 टन अन्नधान्य रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पंढरपूर

सांगली-कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या आवाहनानुसार शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी 25 हजार चादरी, 2 टन तांदूळ, 1 टन डाळ, 1 टन चहा-साखर, 1 टन इतर खाद्य पदार्थ, पिण्याच्या पाण्याचे 13 टँकर आणि दोन होड्या सांगली-कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांसाठी रवाना केल्या आहेत.