
सामना ऑनलाईन । मुंबई
रोखठोक मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली गायिका सोना मोहपात्रा हिने पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोना ही सलमान खानला ट्विटरवर फॉलो करत नसतानाही तिला त्याचे ट्विट दिसत असल्याने तिने ट्विटरवरू याबाबत राग व्यक्त केला आहे. सोनाने याआधी देखील सलमान खानवर काळवीट प्रकरणावरून टीका केली होती. तेव्हा देखील ट्विटरवरून तिने राग व्यक्त केला होता.
Dear @twitter I don’t follow this person & would request you to spruce up your algorithm to NOT put his advertised tweets on my timeline. pic.twitter.com/rEaiVGDtXL
— SONA (@sonamohapatra) March 6, 2019
सलमान खानने बुधवारी त्याच्या भारत या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्याचे ट्विट केले होते. सोना ही सलमानला फॉलो करत नसतानाही तिला ते ट्विट दिसले. त्यामुळे तिने सलमानचे ट्विट्स दिसू नयेत म्हणून ट्विटरला विनंती केली आहे ‘ मी या व्यक्तीला फॉलो करत नाही आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कृपया याचे जाहीरातबाजी करणारे ट्विट्स माझ्या टाईमलाईनवर दिसू देऊ नका’. तिच्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी तिची बाजू न घेता तिला फटकारले आहे. काहींनी तिचे हे ट्विट म्हणजे प्रसिद्धी मिळविण्याचा फंडा असल्याचे म्हटले आहे तर काहींनी तिला सलमानला ब्लॉक करू शकतेस असा सल्ला दिला आहे.

काळवीट प्रकरणात सलमान खानला दोषी ठरविल्यानंतर देखील सोनाने त्याच्यावर टीका केली होती. ‘आता त्या सुपरस्टारच्या वतीने त्याचे वडील माफी मागतील का? त्याला जामीन कधी मिळतोय? त्याचा पुढचा ब्लॉक बस्टर चित्रपट कधी येतोय? दबंग कॉन्सर्ट्स, टूर डेट, बिग बॉस, चॅऱिटी, असे उपरोधिक ट्विट करत तिने सलमानवर निशाणा साधला होता.

सोना मोहपात्रा हिने प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. एका कॉन्सर्टच्या सोना व कैलाश खेर यांची भेट झाली होती. त्यावेळी बोलताना केलास यांनी तिच्या मांडीवर हात ठेवला होता असा आरोप तिने केला आहे. तसेच त्यानंतर तिने बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कार्यक्रमाला गेली असताना कैलाश खेर तिला सातत्यानेफोन करून त्रास देत होते, असा देखील आरोप तिने केला होता.























































