सोनाली बेंद्रेला कर्करोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची माहिती बुधवारी दिली. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या आजारातून ती लवकर बरी होवो, अशा सदिच्छा चाहते व्यक्त करीत आहेत.

भावनिक पोस्टमध्ये सोनालीने लिहिलेय, ‘कधी कधी आयुष्य अनपेक्षित कळण घेते. मला हायग्रेड कर्करोगाने ग्रासले आहे. माझ्याकर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. मी नेहमीच सकारात्मक विचार करते. त्यामुळे मी या कॅन्सरशी लढा देणारच. गेल्या काही दिवसांत मला जे प्रेम आणि आधार मिळाला त्याने लढण्यासाठी बळ दिले आहे.’