
सोनी बीबीसी अर्थने मेटाव्हर्समध्ये अविस्मरणीय प्रवास देणारे दोन आभासी जग विकसित केले आहेत. या माध्यमातून शहरांतील लोकांना जंगलाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. प्रेक्षकांना ध्रुवीय प्रदेशात पाऊल ठेवण्याची आणि पेंग्विन, सील आणि ध्रुवीय अस्वलांचे वास्तव्य असलेले चित्तथरारक जग मेटाव्हर्समध्ये अनुभवाने पाहता येणार आहे. तसेच उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट टूकन, चित्ता, मगर आणि जॅकलसह हिरव्यागार जंगलात फिरता येईल. सर्व वयोगटांतील लोकांसाठी मेटाव्हर्सचा भन्नाट आभासी अनुभव असेल. ज्येष्ठ नागरिकही या व्हिज्युअल ट्रीटचा आनंद घेताना दिसत आहेत.





























































