
चटणी खमंग, चवदार आणि परफेक्ट होण्यासाठी ओल्या नारळाच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीत लसूण, जिरे आणि कोथिंबीरचे देठ थोडे आधीच वाटा.
नारळाच्या चटणीत थोडे फुटाणे किंवा तेलात परतून घेतलेली चणा डाळ घातल्यास चटणी दाणेदार आणि घट्ट होते.
चटणीला हलका आंबटपणा हवा असल्यास वाटताना चिंचेचा छोटा तुकडा किंवा दोन चमचे ताजे दही वापरा.
चटणी वाटून झाल्यावर वरून मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरचीची खमंग फोडणी द्या.





























































