सीमेवर जाण्याअगोदर जवान करतायेत ‘स्पर्म फ्रीजिंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गोरखपुर

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधामुळे सीमेवरील वातावरण नेहमीच तापलेले असते. अशा वेळी देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे जवान आता ‘स्पर्म फ्रीजिंग’ करू लागले आहेत. यामध्ये ज्यांचं नुकतंच लग्न झालंय किंवा ज्यांना अजून मुलं-बाळं झालेली नाहीत अशा जवानांचा समावेश आहे. विशेष करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर स्पर्म फ्रीजिंगचे प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये गेल्या चार वर्षांत 350 जवानांनी स्पर्म फ्रीजिंग केले आहे. सीमेवर असताना अतिशय धोका पत्करून राहणारे जवान किंवा प्रसंगी वीरमरणही येऊ शकेल. असे जवान आपला वंश टिकावा यासाठी ड्युटीवर रुजू होण्याअगोदर स्पर्म फ्रीजिंग करतात. गोठवून ठेवलेले हे स्पर्म 5 वर्ष सुरक्षित राहत असून गोरखपूरमधे तीन खासगी रुग्णालयात अशाप्रकारची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी वर्षाला 3 हजार रूपये दर आकारला जातो. लिक्विड नायट्रोजनच्या कंटेनरमध्ये उणे 197 अंश सेल्सिअस तापमानात हे स्पर्म ठेवले जातात. स्पर्म फ्रीजिंग करणाऱ्या जवानांमध्ये निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश जास्त आहे, अशी माहिती गोरखपूरमधील डॉक्टर सुरहिता करीम यांनी दिली आहे.