
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या सोहळ्यात वर्षा उसगावकर आणि हर्षदा खानविलकर पहिल्यांदाच एकत्र थिरकताना दिसणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दोघींचा निराळा अंदाज पाहायला मिळाला. एका धमाकेदार मराठी गाण्यावर जोशपूर्ण परफॉर्मन्स देत या दोन्ही तारकांनी सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली. नृत्याविष्काराबद्दल वर्षा उसगावकर म्हणाल्या, ‘माझा आणि हर्षदाचा परफॉर्मन्स चाहत्यांसाठी सुखद धक्का असणार आहे.

























































