
योगेश पाटील । हिगोली
महाराष्ट्र राज्य गृहवित्त महामंडळाच्या संचालक पदाच्या झालेल्या निवडणुकीत मराठवाडा विभागातून हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत चव्हाण यांनी भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आस्मान दाखविले
महाराष्ट्र राज्य गृहवित्त महामंडळाचे अध्यक्ष म्हणून हिंगोलीचे विद्यमान उपनगराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी काम केले आहे. मागील पंधरा वर्षाहून अधिक काळापासून या महामंडळावर दिलीप चव्हाण हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. संचालक पदाच्या ३१ पैकी ५ जागा बिनविरोध आल्या होत्या. तर मराठवाडा विभागातील संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, परभणीसह अन्य चार जिल्ह्यातुन चार जागेसाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. यापैकी दिलीप चव्हाण हे देखील एक उमेदवार होते. १ जुलै रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली. यामध्ये दिलीप चव्हाण यांनी विजयश्री मिळविली आहे. दिलीप चव्हाण यांनी ११० मते मिळविली आहेत.

































































